औंध येथे यमाई यात्रा नियोजन बैठक

औंध : औंध यमाई यात्रा नियोजन बैठकीत बोलताना अनिल वडणेरे.

औंध, दि. 11 (वार्ताहर) – औंध यात्रेमध्ये नियोजनबद्धता व अडचणीसंदर्भात प्रशासन व स्थानिक नागरिक यांच्यात नियोजन व अडचणीबाबत गुरुवारी सायंकाळी डीवायएसपी व नायब तहसीलदार यांचे मार्फत यात्रा सुरक्षेचा संदर्भात बैठक घेण्यात आली.
श्रीयमाई देवी यात्रा औंध ही काही दिवसातच येत असल्याने भक्त भाविक, पर्यटक व पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षितेचा प्रश्न हाती घेऊन दि. 10 रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस स्टेशन औंध येथे पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल वडणेरे व नायब तहसीलदार बी. एम. भादुले त्यांची मार्फत यात्रा नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी देवीचा पालखी छबिना व रथ उत्सव तसेच संपूर्ण यात्रेतील स्पर्धा व कार्यक्रम संदर्भात स्थानिक यात्रा कमिटी, देवस्थान कमिटी, ग्रामस्थ तसेच प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाली. उत्सवासाठी होणारी गर्दी व सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, रथ मार्ग रस्ते तसेच चोरीच्या प्रकारांवर नियंत्रण महत्वपूर्ण चर्चा झाल्या. डीवायएसपी अनिल वडणेरे यांनी मार्गदर्शन केले. सरपंच नंदिनी इंगळे, उपसरपंच सचिन शिंदे, औंध सर्कल अधिकारी राऊत, तलाठी घनवट, देवस्थान कारभारी उमेश थोरात, पशुवैद्यकीय कर्मचारी शिंदे, विद्युत व आरोग्य विभाग कर्मचारी, रिक्षा चालक संघटना तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. सपोनि सुनील जाधव आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)