औंध आयटीमधील रोबोटिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे (आयटीआय) विद्यार्थ्यांना रोबोटिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक व मेकॅट्रोनिक्‍स या विषयावर आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान शिकविणारे देशातील पहिले आयटीआय होण्याचा बहुमान औंध आयटीआयला मिळाला आहे.

या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे औंध आयटीआय तंत्र सल्लागार समितीचे अध्यक्ष व आमदार विजय काळे यांनी सांगितले. यावेळी औंध आयटीआयचे प्राचार्य प्रकाश सायगावकर उपस्थित होते. काळे म्हणाले, औंध आयटीआयला 2 कोटी 68 लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. यातील 75 टक्‍के निधी केंद्र सरकार व 25 टक्‍के निधी राज्य सरकारकडून मिळत आहे. दोन्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी डी. व्ही. कुलकर्णी व एन. एम. काजळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

रोबोटिक्‍स अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
मेकॅट्रॉनिक्‍सला पूरक असलेल्या रोबोटिक्‍स तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमासाठी जपानच्या यासकावा या कंपनीचे रोबोट घेण्यात आले आहे. याची किंमत जवळपास 93 लाख इतकी आहे. कंपन्यांमध्ये आवश्‍यक असणारे रोबोटिक्‍सचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये मिळणार आहे. कंपन्यांची गरज लक्षात घेऊन आयटीआय संस्थेमार्फत माफक शुल्कात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
रोबोटिक्‍स प्रोग्रॅम हा एक महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून त्याची प्रवेशक्षमता 18 इतकी आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. अभियांत्रिकीची पदवी, पदविका किंवा आयटीआय असलेला विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)