औंधमध्ये विकासकामांचे नारळ फुटले

औंध – औंध, ता. खटाव येथे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व चारुशीला राजे यांच्या हस्ते नारळ फोडून अनेक विविध विकासकामांचे उद्‌घाटन करण्यात आले. औंध येथे सरपंच नंदीनी इंगळे व जि. प. सदस्य शिवाजी सर्वगोड यांच्या प्रयत्नातून दलित वस्ती सुधार योजनेतून मातंग वस्ती गटार, सिमेंट रस्ता, कुंभार वस्ती रस्ता, सभामंडप, मुस्लिम समाज सभामंडप, बेघरवस्ती कॉंक्रीट रस्ता, बेघरवस्ती थायमा सलाम कॉंक्रेट रस्ता, गणेशवाडी गणपती मंदिर परिसर पेवर ब्लॉक, जिल्हा परिषद सेस फंडातून, तसेच मिनी वॉटर सप्लाय मातंग वस्ती व बौद्ध वस्ती वस्ती शौचालय युनिट, पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था, अशा अनेक कामांच्या उद्‌घाटनाचे नारळ फुटले. हनमंत शिंदे यांनी विकासकामांबाबत माहिती देली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)