औंधमध्ये मतदारांसाठी नवीन यंत्रणेची माहिती

औंध – महसूल विभाग खटाव यांच्या मार्फत खटाव तालुक्‍यात विविध ठिकाणी मतदान प्रक्रियेत प्रशासनाने केलेला बदल व त्यातील पारदर्शकता लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी औंधमध्ये मतदारांसाठी नवीन यंत्रणेची माहिती देण्यात आली.

मतदारांमध्ये काही अफवा व मनामध्ये येणारी अनेक विचार व मतदान केंद्रावरती असणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक मशीनवरती बसत नसलेला विश्‍वास पाहूनच प्रशासनाने या मतदान प्रक्रियेत केलेला बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल विभागामार्फत सर्कल व तलाठी यांच्यामार्फत मंगळवारी ग्रामपंचायत येथे मतदान प्रक्रियेत नवीन प्रिंट लोकांसमोर मशीन लोकांसमोर दाखवण्यात आल्या व त्याच्या संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी औंधसर्कल ऑफिसर राऊत यांनी आलेल्या मतदार नागरिकांना याची माहिती देत सांगितले की या मशीनद्वारे आपण ज्या चिन्हाला व नावाला मतदान केली आहे ते मतदान तुम्हाला नवीन सुधारित आलेल्या मशीनमध्ये सात सेकंद दिसू शकते व ते बरोबर असल्याची खात्री करून मतदारांनी घ्यावी असे आवाहन केले असून यामध्ये आपण आपले दिलेले मत हे प्रिंट द्वारे मशीनमध्ये साठवले जाते यासंदर्भात मतदारास नवीन मशीन हाताळून सर्कल तसेच तलाठी यांच्यामार्फत माहिती देण्यात आली यावेळी औध तलाठी घनवट, येळीव तलाठी तडवळेकर तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच मतदार नागरिक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)