औंधच्या श्री यमाईदेवीचे स्थानमहात्म्य

महाराष्ट्रातील आदिमायेच्या प्रमुख स्थानांमध्ये औंधची यमाई या मंदिराचा समावेश केला जातो. सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत खटाव तालुक्‍यात औंध नावाचे एक छोटे गाव आहे. तेथील पुरोगामी आणि कलाप्रेमी संस्थानिकांनी ब्रिटिशांच्या काळातसुद्धा चांगला नावलौकीक कमावला होता. औंधला एका टेकडीवर यमाईमातेचे सुंदर मंदिर आहे. त्याच्या जवळच श्रीभवानी म्युझियम आहे. राजा रविवर्मा, रावबहादुर धुरंधर, पं. सातवळेकर आणि हेन्‍री मूर वगैरे जगप्रसिद्ध कलाकारांची चित्रे आणि शिल्पकृती या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.

यमाई देवीच्या अस्तित्वाची कथा सांगितली जाते. तो काळ म्हणजे दंडकारण्याचा. जेव्हा येथे मनुष्य वस्ती फारच विरळ. वृक्षवल्लींची दाट वस्ती. त्यातूनही ऋषी मुनी, देव-देवता यांची या शांत परिसरात विश्रांतीसाठी पसंती होती. मनुष्याचा उद्धार करण्यासाठी परमेश्‍वर स्वतः अवतार घेत. विविध लीला करून दाखवत. अशाच एकदा घनदाट अरण्यात शंकर-पार्वती सारीपाठ खेळत होते. तेव्हा पर्वतीमातेचे एका मानवी आवाजाने लक्ष वेधून घेतले. त्यांनी शंकर भगवानांना विनंती केली, कुणा एका मनुष्यास आपली मदत हवी आहे तरी तुम्ही तातडीने मदत करा.

-Ads-

शंकरांनी पार्वती मातेची समजूत काढली व स्पष्टीकरण दिले. पार्वती, तू ज्यांची काळजी करतेस तो सामान्य माणूस नसून या विश्‍वाची काळजी करणारा विष्णूचा अवतार रघुवंश राजकुमार श्री राम आहे. त्यांची पत्नी सीता हिच्या शोधात श्री राम बाहेर पडले आहेत, याचा अर्थ रावणात अंतकाळ जवळ आला आहे. ही त्या भगवंताची लीला आहे आणखी काही नाही.

पार्वतीमातेला या विधानांवरती विश्‍वास बसेना. तेव्हा हे दैवी पुरुष मग सीतेसाठी शोक का? सीतेसाठी हा शोध का? श्रीरामांची परीक्षा घेण्याचे पार्वतीमातेने योजले. शंकराची अनुमती घेतली व सीतेचे रूप धारण केले आणि राम-लक्ष्मण यांचा राज्यात पार्वतीमाता सीतेच्या रूपात शोक करत बसली. श्रीरामांनी मात्र अंत:र्नयनांनी माता पार्वतीला ओळखले व ये माई तू शोक का करते?’ असे विचारले व पार्वतीमातेला यमाई’ म्हणून वंदन केले. श्रीरामांना दर्शन देऊन यमाई तेथे अंतर्धान पावली.

पुढे हीच यमाई भक्तांची यमाई माता व ग्रामदैवत बनली. म्हणून पार्वती मातेची तेथेही स्थापना झाली. तरीही पार्वतीमाता श्रीरामांना फसवण्यासाठी पुन्हा सीतेचे सोज्वळ रूप धारण करते. रस्त्यातील लक्ष्मणाला सीतेच्या प्रेमळ आवाजात सोबत नेऊन’ हा वनवास संपवायची विनंती केली, तेव्हा लक्ष्मणलाही हीच आपली सीतामाता हा संपूर्ण विश्‍वास होता. पार्वतीमातेला सीता मानून लक्ष्मण सीता वाहिनीच्या चरणी माथा टेकवतात.

“यमाई’ नावाने प्रसिद्धी पावल्यानंतरही पार्वती मातेने हार मानली नाही. पुन्हा तिने सीतेचे रूप धारण केले. श्रीरामांचे नाव घेत आकांत सुरू केला. केससंभार संपूर्णपणे मोकळा केलेला, डोळ्यात पाणी दाटलेले, तसेच आर्त करुण आवाज पाहून श्रीराम थक्क झाले व म्हणाले “ये मोकळ्या माई’ असे म्हणून पुन्हा श्रीराम व लक्ष्मण यांनी पार्वती मातेला वंदन केले. मोकळाई माई’ पण श्रीरामांची नजर जेव्हा जेव्हा सीतारूपी पार्वती मातेवर पडते तेव्हा त्यांना सत्य उमगते व ते पार्वतीमातेला ओळखतात व म्हणतात, हे माते, तू वारंवार रूप बदलून समोर येतेस? श्रीरामांच्या ह्या प्रश्‍नावरून श्रीराम हे मनुष्य नसून दैवीअवतार असल्याचा पार्वतीमातेच्या लक्षात आले.

पार्वती माता जेव्हा पुन्हा शंकरांना हा वृत्तान्त सांगते तेव्हा शंकर पुन्हा पार्वतीमातेला कथन करतात की, श्रीराम ज्या ज्या वृक्षवल्लींना सीतामातेचा शोध विचारून आलिंगन देत आहेत, ते वृक्ष बनून वर्षानुवर्ष भगवतांची वाट पाहात तपश्‍चर्या करत बसलेले ऋषीमुनी आहेत आणि शरीराने तेही त्यांना बरोबर त्यांना मुक्ती मिळत आहे. पुन्हा श्रीरामांना दर्शन देते तेव्हा ती तेथे तुकाई’ नावाने स्थापित व श्रीरामांवर प्रसन्न होऊन त्यांना विजयीभव’ हा आशीर्वाद देतो. तसेच त्यांना पार्वतीमातेचे श्रीरामांची परीक्षा घेणे हेदेखील विधिलिखित होते.

“यमाई’, “तुकाई’, “मोकळाई’ यांनी पुढे जाऊन भक्तांचा उद्धार करण्याची मोठी जबाबदारी उचलायची आहे, हे दंडकारण्यातील या पवित्र भूमीवरील धर्मस्थापना निश्‍चित आहे. ऐकून पार्वती मातेने शंकरांना भक्तिभावाने वंदन केले. यमाईदेवीचे औंधासुराशी युद्ध वैकुंठ, स्वर्ग, कैलास, विष्णू निवास अशी विविध देव-देवांची निवासस्थाने असली तरी पृथ्वीतलावर निसर्गाच्या सान्निध्यात राहणे परमेश्‍वर पसंत करतो. जेथे निसर्गमुक्त हस्ताने आपली कलाकौशल्य उधळतो. शांती, गारवा असतो अशा ठिकाणी परमेश्‍वराचे वास्तव्य असते. असंच एक ठिकाण दंडकारण्य म्हणून ओळखले गेलेल्या अरण्याचा कुकुंम तिलक म्हणजे सध्याचा औंधमधील डोंगरपरिसर मूळपीठ.

आज सुद्धा यमाई मंदिराच्या समोरच देवीच्या गाभाऱ्यातील दर्शन घडते. या पद्धतीने औंधासुराचे छोटे मंदिर बांधले गेलेले आढळते. भक्त यमाई दर्शनाबरोबर औंधासुराचेदेखील दर्शन आवर्जून घेतात.

– श्रुती कुलकर्णी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)