औंढे खुर्द येथे दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

औंढे (ता. मावळ) : येथील नागनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना गजानन चिंचवडे मान्यवर.

कार्ला – मावळ विद्या प्रतिष्ठान लोणावळा यांच्या वतीने कै रामचंद्र यशवंत देशमुख यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आंढै येथील नागनाथ माध्यमिक विद्यालयात दहावी बारावी परिक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजू खांडभोर, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, सल्लागार भारत ठाकुर, माजी उपसभापती शरद हुलावळे, संघटक मावळ शिवसेना सुरेश गायकवाड, मावळ महिला शिवसेना संघटक आशा देशमुख, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष किरण गायकवाड, अध्यक्ष मावळ विद्या प्रतिष्ठान संदीप देशमुख, वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश केदारी, डॉ. एस. सी. परमार, उपतालुका प्रमुख अशिष ठोंबरे, नगरसेवक सुनील इंगूळकर, शिवदास पिल्ले, औंढे गावचे सरंपच संगीता निकम, वाकसईचे सरंपच दिपक काशिकर, वेहरगाव सरंपच दत्तात्रय पडवळ, कुंभार समाज जिल्हा अध्यक्ष संतोष कुंभार, एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष विजय देशमुख, एकवीरा पतसंस्था अध्यक्ष जयवंत देशमुख, काळुराम देशमुख, बबनराव अनसुरकर, संजय भोईर, मनिष पवार, बी. बी. पाटील, अनंता हुलावळे, युवराज पडवळ, मोरेश्‍वर पडवळ, महेंद्र शिंदे, विनायक हुलावळे, विष्णू हुलावळे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमाचे संयोजन मावळ विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीरा सेवा प्रतिष्ठान, एकविरा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, नागनाथ माध्यमिक विद्यालय, दादा देशमुख मेमोरियल विद्यालय, देवघर येथील स्व. वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक ऍड. अमृता देशमुख यांनी केले. सूत्रसचालन अंकुश देशमुख यांनी केले. ऍड. दिंगबर देशमुख आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)