औंढे-औंढोली येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

औंढे : येथील नागनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना.

कार्ला, (वार्ताहर) – रामचंद्र यशवंत देशमुख यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठानच्या औंढे-औंढोली येथील नागनाथ माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावी परिक्षेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मावळ तालुका प्रमुख राजू खंडभोर, माजी उपसभापती शरद हुलावळे, तालुका उपप्रमुख सुरेश गायकवाड, माजी शिक्षण सभापती विनय विद्‌ध्वंस, जिल्हा परिषद सदस्या अलका धनिवले, अंकुशराव देशमुख, दिलीप आंबेकर, मुख्याध्यापक बी. बी. पाटील, पंचायत समिती सदस्या राजेश्री संतोष राऊत, भाऊ हुलावळे, सागर हुलावळे, आशिष बुटाला, युवराज पडवळ, सचिन देशमुख, किसन येवले, सोपान सुतार, नवनाथ देशमुख, भगवान देशमुख, बाळू येवले, संतोष राऊत, महेंद्र देशमुख, गणेश मा. देशमुख, हिमचंद देशमुख, जालिंदर शिर्के, गणेश दहिभाते, मोरेश्‍वर पडवळ व अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक ऍड. जयवंत देशमुख यांनी व सूत्रसंचालन आरती खेंगरे यांनी केले. ऋषिकेश देशमुख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)