ओसामाच्या मुलाचा महंमद अट्टाच्या मुलीशी विवाह

अट्टा अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार
लंडन – अलकायदाचा ठार झालेला प्रमुख ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन याने महंमद अट्टाच्या मुलीशी लग्न केल्याची बातमी आहे. हा महंमद अट्टा हा अमेरिकेवर 9/11 ला झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तो स्वत:ही हे विमान लक्ष्यावर धडकवताना ठार झाला आहे. अट्टाच्या मुलीचे हमजा बिन लादेन बरोबर लग्न झाल्याची बातमी गार्डियन या वृत्तपत्राने त्याच्या कुटुंबियांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर प्रसिद्ध केली आहे.

महंमद अट्टा हा मुळचा इजिप्तचा नागरीक होता. त्याने अमेरिकेतील विमान कंपनीचे पहिले विमान पळवून ते न्युयॉर्क वरील वर्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील टॉवरवर धडकावले होते त्यात विमानातील 92 जण आणि टॉवरच्या परिसरातील 1600 जण ठार झाले होते. लादेनचा पुत्र हमजा हा 29 वर्षीय असून तो सध्या अलकायदाची सूत्रे हलवतो आहे असे सांगण्यात येते. त्याने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्धारही अलिकडेच व्यक्त केला आहे. ओसामा बिन लादेनच्या ज्या तीन पत्नी हयात आहेत त्यापैकी खैरीया साबर या पत्नीचा हमजा हा मुलगा आहे.

-Ads-

ही खैरीया आपला पती लादेन याच्या बरोबरच पाकिस्तानच्या अबोटाबाद येथील घरात राहात होती. तेथेच अमेरिकेने लादेनचा खात्मा केला होता. नवविवहीत दाम्पत्य नेमके कोठे आहे याची माहिती मिळू शकली नाही पण ते बहुधा अफगाणिस्तानातच कोठेतरी असावे असे मानले जात आहे. सध्या अलकायदाचा प्रमुख म्हणून आयमान अल जवाहिरी हा काम पहात असला तरी त्याच्या नंतर अलकायदाची सारी सूत्रे याच हमजाकडे जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. अमेरिकेसह अन्य देशांच्या लष्करी यंत्रणा हमजाचा शोध घेत आहेत पण अजून तो सापडलेला नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)