ओशोंच्या मृत्यपत्राची मुळ प्रत आणण्याचा प्रयत्न

पुणे पोलिसांचा तपासाचा प्रगत अहवाल उच्च न्यायालयात सादर
मुंबई – आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतात आणण्याच्या हालचालींना सुरू असून लवकरच केंद्रातील पराराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने तपासयंत्रणा स्पेन न्यायालयातून ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतीय न्यायालयात सादर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दिली. तसेच तपासचा प्रगत अहवालही सादर केला.

ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या विश्‍वस्तांनी ओशोंची बनावट सही करून ट्रस्टचा मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या मालकीच्या खासगी कंपन्यांच्या खात्यात वळवला, असा आरोप करत योगेश ठक्कर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी तपास यंत्रणेने तपासाचा प्रगत अहवाल न्यायालयात सादर केला.

तसेच सध्या उपलब्ध असलेल्या मृत्यूपत्राच्या झेरॉक्‍सवरून त्याची सत्यता तपासण्यात हॉंडराइटिंग एक्‍सपर्ट असमर्थ असल्याने परदेशातील स्पेनच्या कोर्टात यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यातील मूळ कागदपत्रे आणि मृत्यूपत्राची प्रत मागविण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रयत्न सुरु असल्याची माहिती तपास यंत्रणेनी न्यायालयाला दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी 29 जूनपर्यंत तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)