ओव्हरलोडेड ऊस ट्रॅक्‍टर वाहनचालकांचा यमदूत

छत्रपती कारखान्यातील स्थिती : ट्रॉलीला रिफ्लेक्‍टरच नाही

भवानीनगर- सध्या ऊस तोडणी हंगाम जोमात असून रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्‍टरांची वर्दळ छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरात वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक रस्त्यावरून धावणाऱ्या अन्य वाहनचालकांच्या जीवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरमुळे अपघात घडत असून यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत दोन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस वाहतुकीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्‍टरला प्राधान्य देण्यात येते. त्याचबरोबर ट्रॅक्‍टर मालकाकडून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ऊस वाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. परंतु सदर वाहतूक करताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात. ऊसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्‍टर मालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्‍टर चालक ट्रॅक्‍टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो.एका ट्रॉलीची क्षमता 14 ते 15 टन इतकी असते. परंतु, यामध्ये 18 ते 20 टन भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. तसेच सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरांच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. ट्रॅक्‍टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. यामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्‍टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाईटच्या जोरावर ट्रॅक्‍टरचालक बेफामपणे ट्रॅक्‍टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेक जण जखमी होत असल्याने कारखाना प्रशासनाने यावर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)