ओल्या कचऱ्याचं होतंय सोनं

शेतीसाठी खत : हद्दीजवळील शेतकरी पालिकेच्या मदतीला

पुणे – शहरातील हॉटेल्समधील टाकाऊ आणि इतर ओला कचरा महापालिका हद्दीजवळील गावांमधील शेतकरी शेतीसाठी घेत आहे. सध्या महापालिकेकडून दररोज 120 ते 125 टन कचरा शेतकऱ्यांना दिला जात असून मावळ आणि शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून नुकतीच प्रतीदिन सुमारे 60 टन कचऱ्याची मागणी पालिकेकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात दरदिवशी सुमारे 2 हजार टन कचऱ्याची निर्मिती होते. त्यातील 1,150 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यात सुमारे 560 टन हा कचरा ओला कचरा असतो. तो वर्गीकरण करून महापालिकेकडे जमा होतो. काही वर्षांपूर्वी या वर्गीकरण केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसे प्रकल्प नसल्याने हा ओला कचरा घेऊन जाण्याची विनंती पालिकेने आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांना केली होती. त्यानुसार, आता थेट शेतापर्यंत हा कचरा पुरविला जातो. सध्या पालिकेकडून सुमारे 125 टन कचरा यवत, भोर, वेल्हा, नसरापूर, लोणी, मुळशी मधील शेतकऱ्यांना दिला जातो. हा ओला कचरा शेतीचा पोत वाढविण्यासाठी चांगला ठरत असल्याने संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांकडून त्याला मागणी आहे. असे असतानाच, मावळ आणि शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून नुकतीच दररोज सुमारे 60 टन कचऱ्याची मागणी पालिकेकडे केली आहे.

महापालिकेने त्यानुसार नियोजन केले जात असून लवकरच या भागातील शेतकऱ्यांनाही कचरा दिला जाणार आहे. त्यामुळे शहरात वर्गीकरणानंतर जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यातील जवळपास 50 टक्के कचरा शेतकऱ्यांकडून घेतला गेल्यास उर्वरित कचऱ्यावर पालिकेच्या बायोगॅस प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे महापालिकेस मोठा दिलासा मिळणार असल्याचे सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.

पावसाळ्यात घटते मागणी
पावसाळ्यात या ओल्या कचऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे चित्र आहे. त्यात प्रमुख्याने शेतीपर्यंत वाहने चिखलातून जाणे शक्‍य नसल्याने तसेच पावसाळ्यात शेतात पाणी भरल्यास हा कचरा टाकल्यास त्याची मोठी दुर्गंधी पसरत असल्याने ही मागणी कमी असते. त्यामुळे या दिवसांमध्ये कशा प्रकारे नियोजन करता येईल, याबाबत प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना सुरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)