ओला, उबेर चालकांचा संप सलग 11 व्या दिवशीही सुरू 

मुंबई: ओला, उबेर कॅब चालकांनी विविध मागण्यांसाठी 22 ऑक्‍टोबरपासून पुकारलेला संप सलग 11 व्या दिवशीही सुरू आहे. ओला, उबर कॅबच्या बेमुदत संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिलोमीटर 16 रुपये, एसी सेदान कॅबसाठी प्रतिकिलोमीटर 18 रुपये तर एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरला किमान 100 ते 150 रुपये भाडेदर निश्‍चित ठेवावे, अशी कॅब चालकांची कंपन्यांकडे मागणी आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्‍सी व्यवस्थेत अचानक आलेल्या बदलामुळे प्रवाशांच्या लांब रांगा असून ओला-उबेरच्या संपामुळे परिस्थिती अजून बिघडली आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टॅक्‍सीसाठी रात्री लांब रांगेत तासन-तास उभे रहावे लागले. जीविके या कंपनीने विमानतळावरच्या टॅक्‍सी सुविधेचा कार्यभार टॅक्‍सी वेल्फेअर युनियनकडून घेतला आहे.

पण त्याचवेळी कंपन्या प्रवाशांकडून तिप्पट भाडे आकारतात. पण त्याचा फायदा चालकांना होत नाही. पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेत. तर दुसरीकडे उबर सारख्या कंपनीने भाडेदरात कपात केली आहे. याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडे ओला, उबेर कॅब चालकां मागण्या मांडून देखील दुर्लक्ष केलं जात आहे, असं आंदोलक चालकांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)