ओलाद्वारा सुरक्षा समिती

बंगळुरू – सुरक्षा विषयक दृष्टिकोनातून प्रवासी वाहतूक कंपनी ओलाने सुरक्षा परिषद स्थापन केली आहे. विविध क्षेत्रातील संस्था आणि मान्यवर परिषदेचे सदस्य आहेत.ही परिषद एकंदरीतच वाहतूक क्षेत्रामध्ये प्रवास आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी उपाय योजण्याच्या दृष्टीने योजना निर्माते, राज्य परिवहन प्राधिकरणांसह, वाहतूक पोलिस विभाग आणि इतर संबंधित भागधारकांबरोबरच कार्य करेल.

यात इंडियन रोड सेफ्टी कॅम्पेन, सेंटर फॉर सोशल रिसर्च या संस्थाचे प्रतिनिधी, डॉ. ओ पी अगरवाल, डॉ. परविंदर सिंग पर्शीचा, डॉ. जी व्ही रामा राव हे सदस्य आहेत. ओलाचे संचालक नतेश प्रकाश यांनी सांगितले की, ओला ही सुरक्षेला प्राधान्य देणारी संघटना असून,सार्वजनिक सुरक्षेसाठी अपवादात्मक कार्य करणाऱ्या तज्ज्ञांशी भागीदारी केली आहे. या सुरक्षा तज्ज्ञांच्या अनुभवाला ओलाच्या तंत्रज्ञान कौशल्य आणि देशातील सर्वदूरपर्यंत पोहोच यांची जोड मिळाल्यामुळे ही परिषद देशातील प्रवासातील सुरक्षितता क्षेत्रास अधिक मजबूत करेल.

सुरक्षा परिषद रस्ता सुरक्षा व्यवस्थापन क्षमतेचे मजबुतीकरण, रस्त्याच्या पायाभूत सुविधांची सुधारित सुरक्षा आणि व्यापक वाहतुकीचे जाळे, वाहनांची वर्धित सुरक्षा रस्त्याच्या वापरकर्त्यांचे सुधारीत वर्तन, धडक झाल्यानंतरची सुधारित काळजी या विषयावर काम करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)