ओलांद यांच्या आरोपावर सितारामन यांचे प्रतिआरोप

स्वतःवर आरोप असतानाच ओलांद यांच्याकडून आरोप


राहुल गांधींनाही केले टीकेचे लक्ष्य

चेन्नई – राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारासंदर्भात फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रॅन्कां ओलांद यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी आरोपांनीच प्रत्युत्तर दिले आहे. ओलांद यांच्या सहकाऱ्यांनी काही कारणासाठी पैसे घेतल्याचे आरोप व्हायला लागले असतानाच ओलांद यांच्याकडून हे आरोप होत आहेत, असे सितारामन म्हणाल्या. “ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकेडमी’मध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना सितारामन यांनी ओलांद यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

ओलांद यांच्या स्वतःच्या सहकाऱ्यांवरच काही कारणासाठी पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे ओलांद यांच्यावरील आरोप खरे असतील किंवा खोटेही असतील. मात्र सध्याच्या परिस्थितीत माजी अध्यक्षांचे म्हणणे तरी तसेच आहे, असे सितारामन म्हणाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

21 सप्टेंबर रोजी फ्रेंच माध्यमांनी ओलांद यांच्या हवाल्याने एक वृत्त प्रसिद्ध केले होते. राफेल विमानांच्या निर्मितीसाठी दासॉल्ट एव्हिएशनबरोबर भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सचा पर्याय भारत सरकारकडूनच देण्यात आला होता. राफेल विमानांच्या 58 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी फ्रान्सपुढे कोणताही पर्यायच शिल्लक राहिला नव्हता, असे ओलांद यांनी म्हटल्याचे हे वृत्त होते.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही 30 ऑगस्ट रोजीच्या ट्विटमध्ये तसाच आरोप केला होता. त्यावर गांधी यांना ओलांद यांच्या कृतीचा आगोदरच अंदाज आला होता का, असा खोचक प्रश्‍नही सितारामन यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)