ओम नमः शिवायच्या जयघोषात लोणीत शिवलिंग प्राणप्रतिष्ठापणा

लोणी – ओम नमः शिवाय, हर हर महादेवच्या जयघोषात लोणी बुद्रुक येथील महादेव मंदिरात नूतन शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. युवा नेते डॉ. सुजय विखे, धनश्री विखे, विमल आणि रमेश कटारिया यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा झाली.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व लोणी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सत्तर वर्षांपूर्वी दगडूराम बाळाराम कटारिया यांनी लोणी बुद्रुक येथे महादेव मंदिर बांधून त्यात शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यांनी काही काळातच हे मंदिर गावाकडे सुपूर्द केले होते. या मंदिरातील शिवलिंगाची झीज झाल्याचे लक्षात आल्याने त्याचा जीर्णोद्धार करावा ही पद्मभूषण बाळासाहेब विखे यांची इच्छा त्यांच्या आजारपणामुळे अपूर्ण राहिली. परंतु विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि.प. अध्यक्षा शालिनी विखे, डॉ. सुजय विखे, राजेंद्र विखे पाटील मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी जिर्णोद्धाराचा निर्णय घेतला. त्यानुसार कटारिया कुटुंबियांचे योगदान लक्षात घेऊन ग्रामस्थांनी त्यांना सन्मानाने या सोहळ्यात सहभागी करून घेतले. डॉ.सुजय व धनश्री यांच्यासमवेत दगडूराम यांचे वंशज रमेश कटारिया व विमल यांना पूजेचा मान देण्यात आला. राक्षस भुवन येथील वेदांताचार्य पोपट गुरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवस मंत्रोचारात मूर्तींचा धार्मिक विधी केला.

शिवलिंगाबरोबरच नंदी, गणपती, पार्वती, कासव आणि वेताळबाबा यांच्या मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ग्रामस्थ आणि भाविकांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव च्या जयघोषात अतिशय मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापणा केली. बालगोपाळांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला. यावेळी पोपट गुरू यांनी लोणी गावाला अध्यात्म, संतसेवा, ईश्‍वर सेवा याबरोबरच समाजसेवेची मोठी परंपरा लाभली आहे.

यावेळी कटारिया परिवारातील रमेश कटारिया, सुभाष कटारिया, रवींद्र कटारिया, विमल गुगळे, सुनीता चंगेडिया, हिराबाई चोपडा आदी उपस्थित होते. भाविकांना महाप्रसाद वाटपानंतर सोहळ्याची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)