ओम दळवी मेमोरियल अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धा: ‘या’ खेळाडूंची आगेकूच

गिरिष चौगुले, सर्वेश बिरमाने, तेंझीन मेनडेस, संजीनी कुतवळ यांची आगेकुच

पुणे: गिरिष चौगुले, सर्वेश बिरमाने, अर्णव साने, कनव गोयल, प्रथम भुजबळ, तेंझीन मेनडेस, संजीनी कुतवळ, दिविजा गोडसे, समिक्षा श्रॉफ, वैदेही काटकर व अभिषा राईकलार यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत विजयी आगेकुच केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र पोलिस (एमटी जिमखाना) टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या पात्रता फेरीत गिरिष चौगुलेने संदेश कुरलेचा 9-8(3) असा पराभव करत आगेकुच केली. तर, सर्वेश बिरमानेने पार्थ सुंब्रेचा 9-2 असा तर अर्णव सानेने नवदिश वंझानीचा 9-4 असा सहज पराभव करत स्पर्धेत विजयी आगेकुच नोंदवली.

मुलींच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत तेंझीन मेनडेस हिने भान्वी कापलेचा 9-3 तर संजीनी कुतवळने मोहिनी घुलेचा 9-5 असा एकतर्फी पराभव केला. दिविजा गोडसेने म्रिगा राणेचा 9-1 असा तर समिक्षा श्रॉफने मान्या परांगेचा 9-6 असा पराभव करत विजयी आगेकूच केली.

सविस्तर निकाल –

दुसरी पात्रता फेरी : मुले – गिरिष चौगुले (महाराष्ट्र) वि.वि संदेश कुरले (महाराष्ट्र)9-8(3), सर्वेश बिरमाने (महाराष्ट्र) वि.वि पार्थ सुंब्रे (महाराष्ट्र)9-2, अर्णव साने (महाराष्ट्र) वि.वि नवदिश वंझानी(महाराष्ट्र) 9-4, कनव गोयल (महाराष्ट्र) वि.वि ओम कक्कर (महाराष्ट्र)9-8(6), प्रथम भुजबळ (महाराष्ट्र) वि.वि ईशान गोडभरले(महाराष्ट्र) 9-4.
पहिली पात्रता फेरी : मुली – तेंझीन मेनडेस (महाराष्ट्र) वि.वि भान्वी कापले (महाराष्ट्र)9-3, संजीनी कुतवळ(महाराष्ट्र) वि.वि मोहिनी घुले (महाराष्ट्र) 9-5, दिविजा गोडसे (महाराष्ट्र) वि.वि म्रिगा राणे (महाराष्ट्र) 9-1, समिक्षा श्रॉफ (महाराष्ट्र) वि.वि मान्या परांगे (महाराष्ट्र)9-6,
वैदेही काटकर (महाराष्ट्र) वि.वि भाविका गुंडेचा (महाराष्ट्र) 9-7, अभिषा राईकलार (महाराष्ट्र) वि.वि श्रेया जोशी (महाराष्ट्र)9-2.

स्पर्धेची मानांकन यादी- मुले

1. सुशांत दबस(हरियाणा), 2. डेनिम यादव(मध्य प्रदेश), 3. उदित कंबोज(हरियाणा), 4. आर्यन भाटीया(महाराष्ट्र), 5. राजेश कन्नन(तमिळनाडू), 6. उदित गोगोई(आसाम), 7. गौरव गुलीया(हरियाणा), 8. सोनु खान(हरियाणा)
मुली- 1. सुदिप्ता कुमार(महाराष्ट्र), 2. बेला ताम्हणकर(महाराष्ट्र), 3. संस्कृती दमेरा(तेलंगणा), 4. गार्गी पवार(महाराष्ट्र), 5. पावनी पाठक(तेलंगणा), 6. हरिनी पार्थीबन(तमिळनाडू), 7. आर्णी रेड्डी येल्लु(तेलंगणा), 8. आयरा सुद(तेलंगणा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)