ओमर अब्दुल्लांच्या आव्हानानंतर राम माधवांची माघार 

पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीमागे पाकिस्तान असल्याचा आरोप मागे

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरमध्ये सरकार स्थापण्याच्या आघाडीमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी मागे घेतला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी माधव यांना हा आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देताच माधव यांनी ही माघार घेतली आहे.

राज्यपालांकडून जम्मू काश्‍मीरची विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपच्या नेत्यांमध्ये ट्विटरवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. राम माधव यांनी ट्विटरवरच्या पोस्टमधून अब्दुल्ला यांना “पीडीपी’बरोबर आघाडी करून पुढील निवडणूका एकत्रित लढण्याची सूचना केली होती. “पीडीपी’ आणि नॅशनल कॉन्फरन्सने मिळून जम्मू काश्‍मीरमध्ये आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न फसल्याच्या संदर्भाने त्यांनी ही सूचना केली होती. नॅशनल कॉन्फरन्स आणि “पीडीपी’ या दोन्ही परस्परविरोधी पक्षांना आघाडी करण्याची सूचना पाकिस्तानातून मिळाल्याचा आरोप माधव यांनी केला होता. त्याला ओमर अब्दुल्ला यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते.

सरकारकडे गुप्तचरांचे विभाग असताना हे आरोप सिद्ध करावेत किंवा माफी मागावी, असे आव्हान अब्दुल्ला यांनी दिले होते. त्यावर माधव यांनी माघार घेत आपल्याला अब्दुल्ला यांच्या देशप्रेमाविषयी प्रश्‍न उपस्थित करायचा नव्हता. मात्र नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीमध्ये अचानक निर्माण झालेल्या प्रेमाबद्दल संशय वाटला होता. आपल्याला दुखवायचा हेतू नव्हता, असे स्पष्टिकरण दिले आहे.

“पीडीपी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्र पाठवून कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर सरकार स्थापण्याचा दावा करणार असल्याचे कळवले होते. यापूर्वी “पीपल्स कॉन्फरन्स’च्या दोन सदस्यांनीही भाजप आणि अन्य पक्षांच्या 18 सदस्यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. पण राज्यपाल मलिक यांनी विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)