ओबीसी संघटनांचा भाजप-सेनेला इशारा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

सातारा – मागील लोकसभा व विधानसभा निवडणूकीत ओबीसी समाजाने मतदान केल्यामुळे भाजप देशात व राज्यात सत्तेवर आले आहे. त्यांनी प्राधान्याने ओबीसींचे हित पाहणे गरजेचे आहे. मात्र, ओबीसींचे नुकसान करून मराठा समाजाला ओबीसींचा दर्जा दिला जात असेल तर येत्या निवडणूकांमध्ये ओबीसी समाज भाजप आणि शिवसेनेला देखील मतदान करणार नाही, असा इशारा ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.

शुक्रवारी ओबीसी संघटनांचे प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत ओबीसी समाजाचे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला ओबीसीकरणाची शिफारस लागू करणारा अहवाल सरकारला सादर केला व तो स्विकारला असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तसेच 1 डिसेंबर रोजी अध्यादेश काढण्यात येणार आहे.

-Ads-

वास्तविक मराठा समाजाला ओबीसी दर्जा देण्याच्या उद्देशानेच आयोग गठीत करण्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच ज्या खासगी संस्थांच्या सर्वेक्षणावर आधारित अहवाल तयार करण्यात आला आहे. त्या संस्था मराठा व ब्राम्हण समाजाच्या आहेत. त्यामध्ये एका ही ओबीसी समाजाच्या संस्थेला समाविष्ठ करून घेतले नाही. ज्या हजार कुटुंबाचे सर्वेक्षण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हे सर्वेक्षण करताना जणगणनेप्रमाणे खोटी माहिती देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आलेली नाही.

त्याच बरोबर सरकारने एसईबीसी नावाचा प्रवर्ग तयार करून अप्रत्यक्ष मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात अप्रत्यक्ष समाविष्ठ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आरक्षण 50 टक्केच्या वर जाणार असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न केल्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणावर परिणाम होणार आहे, असे मत ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. यावेळी प्रमोद क्षिरसागर, भरत लोकरे, भालचंद्र माळी, नंदकुमार महामुनी, बाळकृष्ण देसाई यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)