ओबीसी आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार – मुख्यमंत्री

मुंबई: मराठा आरक्षणसंदर्भांत विधानसभेत चर्चा करण्यात आली दरम्यान, सभागृहात एकच गोंधळ झाला. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात दिली. ओबीसी आरक्षणाला हात न लावता आम्ही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देणार आहोत पण मराठा आरक्षणाबाबत विरोधकांच्या मनात खोट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, मुस्लीम आरक्षणावरुन विरोधक मुस्लीम समाजाच्या भावना भडकावण्याचं काम करत असून विरोधकांना समाजात भांडणं लावायची आहेत असा आरोप मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला.

आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच चर्चिला जात आहे. या मुद्द्यावरून विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षणावर सरकार कायद्यानुसार काम करतंय. कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की वार्षिक रिपोर्ट आणि एक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. विधेयक मांडण्याआधी सभागृहात एटीआर मांडण्यात येईल. राज्यात सध्या 50 टक्के आरक्षण आहे, 52 टक्के नाही, त्यामुळे एसईबीसीचं 2 टक्के आरक्षण जिवंत आहे. 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, आजच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले याआधीही आरक्षणाबाबत अनेक अहवाल आले आहेत. पण ते कधी सादर झाले नाहीत. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात काय आहे याची सरकारने सभागृहाला माहिती द्यावी. हा अहवाल का सादर केला जात नाही. काही लपवले जात आहे का? मुख्यमंत्री म्हणतात मराठा आरक्षणात अडथळा आणला जात आहे. अडथळा कोणीही आणत नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)