ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यात मोठा उद्रेक ! – छगन भुजबळ

मुंबई: छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथे भेट घेऊन ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी जेष्ट विधिज्ञाची नेमणूक करण्यात येणेबाबत मागणी केली. तसेच जर न्यायालयात ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यात मोठा उद्रेक निर्माण होईल याची त्यांना जाणीव करून दिली.

मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाचा प्रश्‍न उच्च न्यायालयात प्रलंबित असताना या आरक्षणामध्ये अडथळा बनत असलेल्या ओबीसी समाजाला यापूर्वी दिलेल्या 32 टक्के आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात दिलेले हे आरक्षण कोणत्याही सर्व्हेक्षण अथवा अभ्यासाच्या आधारे देण्यात आलेले नाही, असा मुद्दा उपस्थित करून उच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)