ओबामा उत्तर कोरियावर हल्ल्यास सज्ज होते – डोनॉल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे उत्तर कोरियावर हल्ला करण्यास सज्ज होते, असा गौप्यस्फोट डोनॉल्ड ट्रम्प यांनी केला आहे. आपल्याला ही गोष्ट खुद्द बराक ओबामा यांनीच सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. जर मी अमेरिकेचा अध्यक्ष झालो नसतो, तर उत्तर कोरियाबरोबर युद्ध अटळ होते असे गुरुवारी एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले.

उत्तर कोरियाबरोबरचे संबंध सुधारण्यास ओबामा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यानी केला आहे. जर उत्तर कोरियाबरोबर युद्ध पेटले असते, तर हजारो नाही, तर लाखो लोक मृत्युमुखी पडले असते. आणि तिसरे महायुद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला असता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी अध्यक्ष झाल्यानंतर उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्याबरोबर माझे वैयक्तिक तसेव अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने संबंध आणि दोन देशांमधील संबंधातही सुधारणा झाली आहे. किम जोंग उन यांनी अलीकडेच मला एक पत्र असून आमची दोघांची लवकरच एक शिखर परिषद आयोजित करण्याच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्री माईक पॉंपियो पुढील महिन्यात उत्तर कोरियाची राजधानी प्यांग्योंगला भेट देणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे. कोरियन द्वीपकल्प निरस्त्रीकरणाबाबत लवकरचे करार होईल अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)