ओबामांसह अन्य प्रसिद्ध व्यक्तींच्या घरी स्फोटके पाठविणारा संशयीत जेरबंद

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी उप राष्ट्रपती जो बाइडेन, माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांच्या समवेत अनेक आजी माजी अधिकाऱ्यांना विस्फोटके असणारे बंद पॅकेट पाठविण्याच्या बाबतीत अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी फ्लोरिडा येथे एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रसार माध्यमांवर आलेल्या विविध वृत्तांमध्ये त्याची ओळख सेसर सायोक (50) अशी सांगितली जात आहे.  तो फ्लोरिडा येथील रहिवासी असून त्याचावर अनेक गुन्हे आहेत आणि त्याचा न्यूयार्कमध्ये मोठा संपर्क आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात सांगितले की, संशयीत व्यक्तीला सध्या पकडले गेले आहे आणि त्याची कसून चौकशी चालू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवारपासून घरी तयार केलेले बॉम्ब आणि अन्य संदिग्ध विस्फोटक उपकरणे ओबामा, क्लिंटन, हॉलीवूड अभिनेता राबर्ट दा नीरो यांच्यासह अनेक लोकांना पाठविले गेले आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, या सर्व गोष्टींवर नजर ठेवणाऱ्या एजन्सीजने अविश्वसनीय काम केले आहे. आम्ही त्या व्यक्तीपर्यंत आणि त्या कृत्यांसाठी जबाबदार व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी तपास केला. हे भीतीदायक  कृत्य खूप निकृष्ट दर्जाचे आहे आणि अश्या कृत्यांना आपल्या देशात थारा नाही.

ट्रम्प पुढे म्हणाले, त्यांनी अधिकार्यांना या कृत्यांसाठी जबाबदार व्यक्तीला शोधण्यासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता येणार याची ग्वाही दिली आणि त्यांना न्यायालयासमोर हजार करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)