ओतूर येथे महारुदाभिषेकाने यात्रेची सांगता

ओतूर-ओतूर (ता. जुन्नर) येथे श्रावण महिन्यातील यात्रेची सांगता महारुदाभिषेक व प्रक्षाळ पूजनाने रविवारी (दि. 27) सांगता करण्यात आली. यानिमित्त सकाळी आठ ते साडेदहा वाजेपर्यंत शरदचंद्रजी पवार फॉर्मसी महाविद्यालय डुंबरवाडी ओतूर येथील प्राचार्य डॉ. गणेश दामा व भाग्यश्री दामा यांच्या हस्ते महारुदाभिषेक करण्यात आला. हा महारुदाभिषेक करण्यासाठी पुण्याचे पुजारी अक्षय रामलिंग स्वामी व सागर स्वामी आले होते. शिवाची सर्वात प्रिय पूजा म्हणजे महारुदाभिषेक .
याप्रसंगी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव वसंत पानसरे, गजानन शिक्षण संस्थेचे सचिव वैभव तांबे, माजी पंचायत समिती सदस्य रामदास तांबे, विघ्नहरचे माजी संचालक आत्माराम गाढवे, निलम तांबे, ग्रामपंचायत सदस्या स्मिता डुंबरे, संतोष तांबे, गांधी पानसरे, राजेंद्र डुंबरे, दत्ता शिंदे, पुजारी गोंविद डुंबरे, दत्तात्रय शिंदे, हभप निवृत्ती महाराज तांबे, सचिन तांबे, अनिल तांबे, दिगांबर काळे, नितीन पन्हाळे, अरुण वाकचौरे, प्रवीण भांबुर्डेकर, बाळासाहेब जंगम, राजेंद्र हांडे देशमुख, पंकज घोलप, शिवाजी अस्वार, संजय डुंबरे प्रदीप गाढवे, चैतन्य प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष महादेव तांबे, रघुनाथ तांबे, पत्रकार रा. ना. मेहेर, रमेश तांबे, पराग जगताप, राजेश हांडे, चैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक, फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य गणेश योगीराज दामा यांनी उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन केले. अनेकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)