ओतूर येथे बीटस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात

ओतूर- शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या विद्यमाने आयोजित बीटस्तरीय शिक्षण परिषद ओतूर (ता. जुन्नर) येथे उत्साहात पार पडली. या परिषदेचा मुख्य हेतू अध्ययन निष्पत्तीवर आधारित विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करून 100 टक्के विद्यार्थ्यांमध्ये 100 टक्के क्षमता अर्थात वाचन लेखन कौशल्य विकसित करणे, गणिती क्रिया कौशल्य विकसित करणे, इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करणे व इतर विषयांमध्ये गती निर्माण करणे हा आहे. या शिक्षण परिषदेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमतांचे निर्धारण करून कमी स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाअखेरीस प्रभुत्व पातळीपर्यंत प्रगत करणे हा आहे. या शिक्षण परिषदेत बल्लाळवाडी, रोहोकडी व उदापूर या केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या दीडशे शिक्षकांनी सहभाग घेतला. या शिक्षण परिषदेच्या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नंबर. 2 च्या अध्यक्षा प्रगती डुंबरे, विस्ताराधिकारी संजय जाधव, केंद्रप्रमुख बाळासाहेब भालेकर, मुख्याध्यापिका सुमन गवारी त्याचबरोबर परिसरातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. प्रभाकर दिघे, हनुमंत गोपाळे,गणपत डोंगरे व वैशाली मस्करे आदी मार्गदर्शक शिक्षकांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया डुंबरे तर रवी डुंबरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)