ओतूर येथे दोन गटांत हाणामारी

ओतूर -दोन गटांत हाणामारी होऊन तीन जण जखमी झाले असून 43 जणांविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ओतूर (ता. जुन्नर) येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओतूर येथील मोमीन गल्ली येथे सार्वजनिक पूजेचे जेवणाच्या कारणावरून सोमवारी (दि. 26) रात्री नऊच्या दरम्यान काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली. त्या घटनेचा मनात रोष धरून मंगळवारी (दि. 27) रात्री नऊच्या दरम्यान बेकायदा जमाव जमवून लाकडी दांडक्‍याने मारहाण केल्याने त्यात तीन जण जखमी झाल्याचे समजते. तसेच जहीर चॉंदमियॉं मोमीन (वय 36) याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नासीर ईब्राहिम मनियार आणि इतर 15 जणांविरोधात तक्रार दिली. तर नौशाद ईब्राहिम मनियार (वय 43, रा. ओतूर बाजारपेठ) याने रशिद सुलेमान मोमीन (वय 25) व इतर 28 जणांविरुद्ध परस्पर तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. 28) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार के. एम. पाटोळे यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस सूरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेंद्र पवार आणि पोलीस नाईक तावजी दाते करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)