ओतूर-येथे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच, मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे, जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्र पुणे व शिक्षणमहर्षि स्व. विलासराव तांबे फौऊंडेशन ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरीता त्यांना एडिप योजनेंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व साधनांचे वाटप करण्याकरीता पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची नाव नोंदणी व मोजमाप शिबीर बुधवारी (दि. 30) पांढरी मारुती मंदिर ओतूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यासाठी दिव्यागांनी ऑनलाइन अंपगत्व प्रमाणपत्र, चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, दिव्यांगत्व दिसणारे दोन फोटो ही अत्यावश्‍यक कागदपत्रे आणणे आवश्‍यक आहे. कागदपत्रांची पूर्तता केलेल्या दिव्यांगांना दुसऱ्या टप्यामध्ये आवश्‍यक असलेले कृत्रिम अवयव व साहित्य बसवून दिले जाणार आहेत. त्याकरतिा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीकरिता श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर यथे संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)