ओतूर बाजारपेठांमध्ये चढू लागला दिवाळीचा रंग

ओतूर-येथे बाजारपेठांमध्ये आता दिवाळीचा रंग चढू लागला आहे. दिवाळी सुरू झाल्याने निरनिराळ्या रंगांच्या पणत्या, रांगोळ्या, आकाशकंदील, फटाके, सुगंधी उटणे, तयार किल्ले तसेच रोषणाईच्या माळा आणि फराळाच्या पदार्थांनी बाजारपेठा सजल्या आहेत. या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे.
दिवाळीचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. ओतूरमध्ये दिवाळीची खरेदी जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. ओतूर शहर परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड पाहायला मिळत आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणा-या केरसुणी, विविध रंगातील आकारातील आकाशकंदील, पणत्या, रांगोळीचे रंग, रेडीमेड फराळ, किराणा साहित्यासह, कपडे अशा विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. इथल्या बाजार पेठेत विविध वस्तू दिसून येत आहे. रांगोळीतही अनेक रंग नव्याने आलेत. पणत्यांमध्येही बरीच व्हरायटी असून हल्ली आकर्षक डिझाईनमधल्या कॅंडल्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. नोकरदार महिलावर्ग मोठ्या संख्येने असल्यानं रेडीमेड फराळ खरेदीसाठी ओतूरमध्ये महिला मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आहेत.

 • चीनी मातीच्या पणत्यांचे आकर्षण
  मातीच्या पणत्यांबरोबर चीनी मातीच्या नक्षीदार पणत्या बाजारापेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या असून त्यांच्या खरेदीकडे लोकांचा अधिक कल आहे. निरनिराळ्या रंगांच्या पणत्या, रांगोळ्या, आकाशकंदील, फटाके, सुगंधी उटणे, तयार किल्ले तसेच रोषणाईच्या माळा आणि फराळाच्या पदार्थानी बाजारपेठा सजल्या आहेत. या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. मातीच्या पणत्यांबरोबर चिनीमातीच्या नक्षीदार पणत्या बाजारापेठेत मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्या असून त्यांच्या खरेदीकडे लोकांचा अधिक कल आहे. मातीच्या पणत्या 30 ते 60 रुपये डझन तर चिनीमातीच्या पणत्या 50 ते 70 रुपये डझन आहेत.
 • विविध प्रकारचे कंदील
  बाजारात पारंपरिक आकाशकंदिलांसह चायना मेड कंदीलही उपलब्ध आहेत; मात्र पारंपरिक कंदिलांना अधिक मागणी आहे. प्लॅस्टिकचे साधे कंदील 80 रुपयांपासून असून चायना कंदील 500 रुपयांपासून विक्रीस आहेत. फिरकी, चांदणी, झालर आदी प्रकारांमध्ये कंदील पाहायला मिळत आहेत.
 • किल्ल्यावर ठेवण्यासाठी पुतळे उपलब्ध
  किल्ल्यांवर ठेवण्यासाठी शिवाजीमहाराज, मावळे, द्वारपाल, तुतारी वाजवणारे मावळे, काम करणारे मावळे, शिपाई, गवळण, वाघ, सिंह, गाय, ससे, बकऱ्या, हातगाडीवाला शेतकरी आदींचे पुतळेही विक्रीस आहेत.
 • रांगोळीला पर्याय
  धकाधकीच्या जीवनात रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नसल्याने रांगोळीच्या तयार नक्षीही उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी खड्यांचा आणि मण्यांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रांगोळ्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. तसेच रांगोळ्या काढण्यासाठी विविध नक्षीकामाच्या गोल जाळी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यांची किंमत 40 ते 50 रुपयांपर्यंत आहे.
 • उटणे, साबणांना मागणी
  दिवाळीनिमित्त लागणाऱ्या उटणे, साबण व अभ्यंग स्नानासाठीच्या तेलांचे बाजारात आगमन झाले असून, आयुर्वेदिक अभ्यंग तेल तसेच सुवासिक साबणांची मागणी वाढली आहे. बावचा, वाळ, मुलतानी माती, गुलाब पाणी, आंबे हळद, मजिष्ठा, तुळस आदी आयुर्वेदिक वनस्पतींची भुकटी करून केलेल्या स्नानगंधा या सुगंधी तेलाला बाजारात मागणी आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)