ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा

ओतूर- ओतूर (ता. जुन्नर) येथे पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 17) तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी हा दिवस साजरा केला जातो. यावेळी विविध भागांतून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ओतूर परिसरातील एकूण 20 तक्रारींची चौकशी करण्यात आली. जुन्नर तालुक्‍याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली हा तक्रार निवारण दिन आयोजित केला जातो. यावेळी आपसातील तंटे मिटविण्यात आले. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले असून, सर्व कर्मचारी वर्ग आणि पोलीस पाटील उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)