ओतूर पोलिीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारीपदी रमेश खुणे

ओतूर- ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक रमेश नारायण खुणे यांनी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्याकडून नुकताच पदभार स्वीकारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांची जुन्नर येथे बदली झाली आहे. पोलीस खात्यात 1996 साली सेवेत दाखल झालेले रमेश खुणे यांनी यापूर्वी पुणे शहर, कोल्हापूर, औरंगाबाद आदी ठिकाणी सेवा केली आहे. यापूर्वी सीआयडी पदावर त्यांनी काम केले आहे. 2006 च्या बॅचमध्ये पीएसआय या पदावर सिलेक्‍शन झाले. ओतूरला येण्यापूर्वी ते स्थानिक गुन्हे पुणे ग्रामीण येथे कार्यरत होते. 10 नोव्हेंबर 2018 ला ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. 22 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. चांगल्या कामगिरीसाठी त्यांना 150 वेळा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)