ओतूर पोलिसांनी जाणल्या विद्यार्थ्यां अडचणी

ओतूर – पोस्टे हद्दीतील मौजे तळेरान येथील निवासी आश्रम शाळेमधील इयत्ता 8 वी ते 12 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती दिली. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्याचे ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी सांगितले.
तक्रार पेटी लावण्याबाबत सूचना दिल्या. यासाठी विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन केली. तसेच निर्भया पथक, दामिनी पथकाबाबत माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना दिल्या. याचबरोबर छेडछाडी आणि कायदे विषयक माहिती दिली. दामिनी पथकातील कर्मचारी यांचे मोबाईल नंबर दिले. सर्व आदिवासी विद्यार्थी असल्याने करिअर विषयक मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस हवालदार के.एम. पाटोळे, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)