ओतूर गावच्या उपसरपंचपदी सुशीला जाधव

ओतूर- ओतूर (ता. जुन्नर) गावच्या उपसरपंचपदी वर्षा तांबे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा सरपंच बाळासाहेब घुले यांच्याकडे दिला होता, त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी मंगळवारी (दि. 26) मतदान घेण्यात आले. उपसरपंचपदासाठी सुशीला धोंडीभाऊ जाधव, स्मिता विनोद डुंबरे आणि आशिष शामकुमार शहा या तिघांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी (दिण 26) निवडणुक अध्यक्ष अधिकारी तथा ओतूरचे सरपंच बाळासाहेब घुले यांनी उपसरपंचपदासाठी मतदान घेतले. या निवडणुकीत सुशीला जाधव यांना दहा मते मिळाली, स्मिता डुंबरे यांना चार मते मिळाली, तर आशिष शहा यांना तीन मते मिळाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक संतोष तांबे, नाशिर मनियार, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुविलास गाढवे, शरद सहकारी बॅंकेचे संचालक विनायक तांबे, शिवसेना उपतालुका प्रमुख ऋषीकेश डुंबरे, शिवसेना शहर प्रमुख रामदास ताजणे, उपशहर प्रमुुुख विवेक पानसरे, ऍड. संजय शेटे, सहादु डोके, सरपंच बाळासाहेब घुले, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय रोंगटे, अनिल तांबे, धनंजय डुंबरे, आशिष शहा, संतोष तांबे, बाळासाहेब ढमाले, रईस मनियार, सविता वेताळ, कुंदा भोरे, भाग्यश्री गिते, मनीषा वारे, सविता थोरात, स्मिता डुंबरे, सुरेखा तांबे, ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी, गोविंदराव तांबे, राजेंद्र डुंबरे,विजय तांबे, मारुती अहिनवे, विक्रम गिते, पंढरीनाथ पानसरे, तसेच ओतूर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)