ओतूरला बेटी बचाओ जन आंदोलन रॅली

ओतूर- ओतूर (ता. जुन्नर ) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाकडून “बेटी बचाओ’ जनआंदोलन रॅलीचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे यांनी दिली. यावेळी “बेटी बचाओ जनआंदोलना’चे प्रणेते डॉ. गणेश राख उपस्थित होते.
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ते ओतूर ग्रामपंचायत दरम्यान काढलेल्या रॅलीमध्ये एनएसएस आणि एनसीसी स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी, ओतूरचे सरपंच बाळासाहेब घुले, माजी उपसरपंच रईस मणियार, डॉ. राहुल घुले, डॉ. शंशाक फापाळे, डॉ. मनिषा बोरा, मतिमंदासाठी काम करणारे विकास घोगरे आणि त्यांचे विद्यार्थी, डॉ. गणेश नायकोडी, मंगेश फाकटकर, डॉ. सुशील बागुल, तसेच आळेफाटा, जुन्नर तालुक्‍यातील डॉक्‍टर्स, मेडिकल स्टोअर्सचे मालक, सोनोग्राफी सेंटर्सचे डॉक्‍टर्स सहभागी झाले होते. या रॅलीचे ग्रामसचिवालय येथे सभेत रुरूपांतर झाले. यावेळी डॉ. गणेश राख आणि डॉ. प्रमोद लोहार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुलगी वाचवा जन आंदोलनाचे प्रणेते डॉ. गणेश राख यांनी आपल्या मनोगतातून भारतीय स्त्रीचे वेगळेपणो स्पष्ट केले. देशातील जवळपास 70 हजार डॉक्‍टर्स या जनआंदोलनात सहभागी झाली आहेत. त्यांच्या या आंदोलनाची नोंद बीबीसी आणि कौन बनेगा करोडपती या कार्यकमात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी घेतली आहे. ही रॅली यशस्वी करण्यासाठी डॉ. किशोर काळदंते, डॉ. नीलेश काळे, डॉ. संतोष वाळके, डॉ. विनायक कुंडलिक, प्रा. राजेंद्र आंबवणे, प्रा. सचिन भोसले, प्रा. सुवर्णा डुंबरे, प्रा. व्ही. व्ही. ढोबळे . प्रा. रत्नमाला मोरे, प्रा. अजित डुंबरे, प्रा. स्वप्नाली दांगट यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य टी. एन. साळवे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख आणि डॉ. शीतल कल्हापुरे यांनी केले, तर आभार डॉ. भूषण वायकर यांनी मानले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)