ओतूरच्या चैतन्य विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा

ओतूर-ग्राम विकास मंडळ ओतूर (ता. जुन्नर) संचलित चैतन्य विद्यालय ओतूरमध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी सहाशे पालक उपस्थित होते, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर दराडे यांनी दिली.
या पालक मेळाव्याचे दोन सत्रांत आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा आहार व आरोग्य, अभ्यासाच्या सवयी व वेळापत्रक, बाह्य परीक्षा, शिस्त, संस्कार, उपस्थिती, गणवेश व दप्तराचे ओझे, पावसाळी सहल, वार्षिक नियोजन व मूल्यमापन, शाळाबाह्य मुले अशा अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर प्रतिक अकोलकर, शरद माळवे, मंगेश तांबे, ब्रम्हदेव घोडके, विशाल चौधरी, मिलिंद खेत्री, अमित झरेकर यांनी मार्गदर्शन केले. पालकांच्या वतीने महेंद्र पानसरे, वर्षा तांबे, अजित पानसरे, डॉ. गणेश नायकोडी, धनंजय डुंबरे, के. आर. तांबे सर, भिवाजी माळवे, गणपत डोंगरे, प्रतिभा तांबे, मेजर भनगडे, यांनी मनोगत व्यक्त केली. आपल्या मनोगतात शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांकडे अतिशय मनापासून लक्ष देतात. बौद्धिक विकासाबरोबर सर्वांगीण विकास शाळेमध्ये केला जातो म्हणून विद्यार्थ्यांची प्रगती चांगली आहे असे सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी ग्राम विकास मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप, दिनकर दराडे, गोरक्षनाथ फापाळे, ज्ञानेश्वर पानसरे, शिल्पा भालेराव, सोनाली पतंगे, सत्यवान खंडाळे, उपस्थित होते. मेळाव्याचे नियोजन पालक शिक्षक संघाचे सचिव अजित डांगे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले. प्रास्ताविक भाऊसाहेब खाडे यांनी केले. सोनाली माळवे, विठ्ठल डुंबरे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)