ओतूरच्या चैतन्य विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

ओतूर- ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालय, ओतूर ( ता. जुन्नर) येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (5 वी) आणि पूर्व माध्यमिक (8 वी) शिष्यवृत्ती परीक्षेत अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याची माहिती मुख्याध्यापक गोरक्षनाथ फापाळे यांनी दिली. पूर्व उच्च प्राथमिक (5 वी) शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी – सानिका बिपीन गायकर, संस्कार मुकेश अरगडे,
पूर्व माध्यमिक (8 वी) शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी – अभिषेक शशिकांत गायकर, अनुष्का अभिजित डुंबरे, आर्यन संजय हिरे, चैत्राली ज्ञानदेव गायकर, गिरीष संभाजीराव शिंदे, जाई संपत पन्हाळे, प्रणित हिरामण शिंगोटे, साक्षी राजेंद्र तांबे,वैष्णवी कृष्णा घाटकर. यशस्वी विद्यार्थ्यांना किसन भुतांबरे, संतोष कांबळे, विशाल चौधरी, लक्ष्मण दुडे, प्रमोद जाधव, विठ्‌ठ्‌ल डुंबरे, मंगेश तांबे, ब्रह्मदेव घोडके, अजित डांगे, राजश्री भालेकर, सोनाली माळवे, शिल्पा भालेराव, सोनाली कांबळे, वैभव देशमुख या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, ज्ञानेश्वर पानसरे, संजय ढमढेरे, विठ्ठल डुंबरे, भाऊसाहेब खाडे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)