ओतूरकरांना मिळणार फिल्टरचे शुद्ध पाणी

ओतूर -ओतूर (ता. जुन्नर) येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्णत्वास आले असून आता ओतूरच्या जनतेस पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. शुक्रवारी (दि. 11) प्लॅन्टचे उद्‌घाटन ग्रामपंचायत सदस्य अनिल तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच बाळासाहेब घुले, उपसरपंच वर्षा तांबे, सदस्य धनंजय डुंबरे, रईस मनियार, आशिष शहा, कुंदा भोरे, दत्तात्रय रोगटे, बाळासाहेब ढमाले, भाग्यश्री गिते, मनिषा वारे, सविता थोरात, सुरेखा तांबे, सुनिता वेताळ, स्मिता डुंबरे, सुशिला जाधव, संतोष तांबे, ग्रामविकास अधिकारी, एस. एन. गवारी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. योजनेविषयी ओतूरचे सरपंच बाळासाहेब घुले यांनी सांगितले की, ओतूर ग्रामस्थांकरीता फिल्टर प्लॅन्टचे शुध्द पाणी देण्यास यश आले असून लवकरात लवकर ग्रामपंचायतच्या सर्व 6 वार्डमधील सुमारे 25 हजार लोकवस्तीस या पाण्याचा लाभ मिळणार आहे. फिल्टर प्लॅन्टचे कार्य कशा पद्धतीने चालणार आहे. याची माहिती देऊन यामुळे ओतूरच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी मिटणार असल्याचा विश्वास सरपंच बाळासाहेब घुले यांनी व्यक्‍त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा तांबे यांनी केले. तर धनंजय डुंबरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)