ओढ…

रिमझिमणाऱ्या पावसात
नभ दाटते
अन बघ कसा साज
चढवतो नभाला हिरव्या शालूपरी
त्या साजापरी वाटते का मला ओढ तुझी…!!!

सह्याद्रीच्या कडिकपारातुन
अडगत मडगत येणाऱ्या
नद्य्यांना  ओढ सागराची
त्या सागरापरी वाटते का मला ओढ तुझी…!!!

चक्र निसर्गाचे फिरत आहे
ऋतू ऋतूंना घेरत आहेत
त्या ऋतूंपरी आठवणींच्या
घेऱ्यांमध्ये वाटते का मला ओढ तुझी…!!!

पुन्हां मागे जावेसे वाटते
त्या आठवणींना
मनभरून जगावेसे वाटते
क्षण तिथेच थांबवावेसे वाटते
फक्त तुझ्या ओढिपरी हे
करावेसे वाटते…

शब्द न बोलताच
निमूटपणे दबल्या पावलांनी
माझ्या समोरून जात आहेत
नजर चुकवून हळूच
मागे पाहत आहेत
चेहऱ्यावरचा भाव त्यांचा
ऐकच सांगून जात आहे
त्या शब्दापरी वाटते का
मला ओढ तुझी…!!!
मला ओढ तुझी…!!!

– निलेश बाळासाहेब गायकवाड 

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
153 :thumbsup:
503 :heart:
0 :joy:
551 :heart_eyes:
161 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)