ओढा खोलीकरणाच्या कामाची पाहणी

मोरगाव -गेल्या पाच वर्षांपासून बारामती तालुक्‍यात दुष्काळ आहे. त्यामुळे अनेक गावांची भुजल पातळी कमालीची घटली आहे. मात्र या दुष्काळामुळे ओढा खोलकरण, बंधारे, बांधबंदीस्ती यामुळे ग्रामीण भागात भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच समाजातील विविध सामाजकि संस्थांनी अशा कामांसाठी पुढाकार घेतल्यास बारामती तालुका पाणीदार होईल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी व्यक्‍त केले.
मासाळवाडी (ता. बारामती) येथील ओढा खोलीकरणाच्या कामाची पाहणी देवकाते यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. मासाळवाडी व तरडोली या गावाच्या शिवेवरील ओढयावर सुमारे दिडशे हेक्‍टर शेतजमीन अवलंबुन आहे.नुकतेच या ओढयाचे खोलीकरण झाले असुन परीसरातील विविध विकास कामांची पाहणी पुणे जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी केली.तरडोली नजीक धायगुडेवस्ती येथील वडजाई माता कलशारोहणाच्या कार्यक्रमानंतर ओढा खोलीकरण कामाची पाहणी करण्यासाठी देवकाते आले होते.
यावेळी पंचायत समीतीचे सदस्य राहुल भापकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुका उपाध्यक्ष तानाजी कोळेकर, माजी सरपंच माणिक मासाळ, सामाजिक कार्यकर्ते भगवान धायगुडे, किसन तांबे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त विनोद पवार, भाऊसाहेब कांबळे, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर आदी उपस्थित होते.
मासाळवाडी (ता. बारामती) : येथील ओढा खोलीकरणाच्या कामाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)