ओढा खोलीकरणाची तहसीलदारांकडून पाहणी

भिगवण- भिगवण (ता. इंदापूर) येथील रोटरी क्‍लबच्यावतीने मदनवाडी येथील 50 लाख रुपये किमतीच्या 4 किमी अंतराच्या ओढा खोलीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून यामध्ये पोकलेनच्या साहाय्याने याठिकाणी खोदाई करण्यात येत आहे. याद्वारे 50 खड्डे खोदण्यात येत आहे. पावसाचे पाणी साचून, मुरुन त्याचा सिंचनासाठी मोठ्याप्रमाणावर हातभार लागणार आहे. गेल्या महिनाभरापासून हे काम सुरू आहे. खोलीकरणाचे सुरू असलेले कामाची पाहणी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केली. मदनवाडी गावातील पूल त्याचप्रमाणे म्हसोबा देवस्थान येथील ओढा याठीकाणचे काम पाहिल्यानंतर पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच काम अजून दर्जेदार कसे करता येईल याबद्दलदेखील काही सूचना केल्या. यावेळी रोटरी क्‍लबचे संस्थापक सचिन बोगावत, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, धनाजी थोरात, महेश शेंडगे, रियाज शेख, प्रभाकर रणदिवे, आबा बंडगर, नितीन चितळकर, दादा थोरात, काशीनाथ सोलनकर,आप्पा वचकल आदी उपस्थित होत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)