ओडीएमटी, लॉ कॉलेज लायन्स संघांची आगेकुच

आयकॉन-अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धा

पुणे: ओडीएमटी व लॉ कॉलेज लायन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आयकॉन- अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत आगेकूच नोंदवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ओडीएमटी संघाने मॉर्निंग स्टार्स संघाचा 18-7 असा पराभव केला. सामन्यात 80अधिक गटात ओडीएमटीच्या सुहास महापारीने चंदन नगडकरच्या साथीत मॉर्निंग स्टार्सच्या संतोष कटारीया व मोहन भंडारी यांचा 6-2असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात कौस्तुभ देशमुख व हिमांशू कपाडीया यांनी आनंद सुलाखे व श्रीराम मोने यांचा 6-5(5) असा टायब्रेकमध्ये पराभव केला तर अतूल मांडवकर व रोहन साने या जोडीने गिता गोडबोले व ललित संचेती यांचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत ओडीएमटी संघाला विजय मिळवून दिला. लॉ कॉलेज लायन्स संघाने रुबी संघाचा 15-9 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

सविस्तर निकाल:

साखळी फेरी:

ओडीएमटी वि.वि मॉर्निंग स्टार्स 18-7(80अधिक गट: सुहास महापारी/ चंदन नगडकर वि.वि संतोष कटारीया/मोहन भंडारी 6-2, खुला गट: कौस्तुभ देशमुख/हिमांशू कपाडीया वि.वि आनंद सुलाखे/श्रीराम मोने 6-5(5); अतूल मांडवकर/रोहन साने वि.वि गिता गोडबोले/ ललित संचेती 6-0),
लॉ कॉलेज लायन्स वि.वि रुबी 15-9( 80अधिक गट: तारक पारिख/शिवाजी यादव पराभूत वि केदार देशपांडे/संजय बोथरा 3-6, खुला गट: संतोष जयभाय/राहूल पंढरपुरे वि.वि प्रतिक वांगीकर/अभिजीत खानविलकर 6-2, अभिजीत मराठे/केतन जठार वि.वि रणजीत पांडे/ अमोल काणे 6-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)