ओडिशामध्ये पुराचे थैमान; नागरिकांचे स्थलांतर

रायगदा (ओडिशा) – ओडिशा राज्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगदा जिल्ह्यातल्या नागावली आणि कल्याणी या दोन महत्वाच्या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे लष्कराला पाचारण करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. या पुरामुळे नागरिकांना आपले घर सोडून दुसरिकडे स्थलांतर करावे लागत आहे.

तसेच या भागात असलेले काही पुल पुरामुळे वाहून गेले असून रेल्वे आणि महामार्गही पाण्याखाली गेल्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बोटीतून आणि ओडिशा राज्य आपत्ती निवारण दलाच्या मदतीने सोडवणे शक्‍य नाही, त्यामुळे नागरिकांच्या मदतीसाठी हवाई दलाची चार हेलिकॉप्टार तैनात करण्यात आली आहेत. कलहांदी जिल्ह्यातीलही अनेक भागांमध्ये पूराचे पाणी पसरले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्य मंत्रिमंडळाची आपत्कालिन बैठक घेऊन तातडीच्या मदत कार्याच्या सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)