ओडिशामध्ये ‘तितली’ नंतर मुसळधार पाऊस : १२ लोकांच्या मृत्यू

ओडिशा- “तितली’ हे चक्रिवादळ  मागील काही दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागावर थडकले. यामुळे अनेक भागात वीजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली. तसेच गंजम आणि गजपती जिल्ह्यात झोपड्यांचे आतोनात नुकसान झाले. मात्र या भागात कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आंध्रच्या श्रीकाकुलम जिल्हा, ओडिशाच्या गोपालपूर या भागांतही पहाटे 4.30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान “तितली’चा फटका बसला होता. वादळ किनाऱ्यावर आल्यानंतर तासभर ताशी 126 किलोमीटर वेगाने वारे वाहिले होते.

दरम्यान “तितली’ या चक्रिवादळानंतर परत एकदा ओडिशा येथील गजपति जिल्हात मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने नासधूस झाली आहे. तसेच गजपती  सुमारे १२ लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे,  तर ४ लोक गंभीरीत्या जुंखमी झाले आहेत. शनिवारी आयुक्त बीपी सेठी यांनी सांगितले, ”ही घटना शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस सुरु असताना घडली. मुसळधार पावसापासून बचावासाठी स्थानिक ग्रामीण लोकांनी गुफेत शरण घेतले.”


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)