ओडिशातील चकमकीत चार नक्षलवादी ठार

संग्रहित छायाचित्र.

कोरापुत – ओडिशा राज्यात रविवारी रात्री सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. नारायणपाटना डोकरी भागातील घाटात काही नक्षलवादी लपून बसले असले असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे शोध मोहीम हाती घेतली त्यावेळी ही चकमक झाली. हल्लेखोर नेमके किती होते याची कल्पना नाही.

तथापी काल घटनास्थळी पोलिसांना तीन जणांचे मृतदेह सापडले. आज सकाळी त्या ठिकाणी शोध घेण्यात आला असता आणखी एक मृतदेह सापडला. चकमकीच्या ठिकाणी मोठ्‌या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे नक्षलवादी नेमक्‍या कोणत्या गटासाठी कार्यरत होते याची माहिती अद्याप मिळालेली नाहीं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)