ओझोनचा थर पूर्ववत होतोय; संयुक्त राष्ट्राने दिली माहिती 

न्यूयॉर्क: सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येण्यापासून रोखणारा पृथ्वीचा सुरक्षात्मक ओझोनचा थर एअरोसॉल स्प्रे आणि अन्य घटकांमुळे होणाऱ्या नुकसानीतून बाहेर पडत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका नव्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ओझोनचा थर 1970 च्या दशकापासून घटू लागला होता. वैज्ञानिकांनी याबद्दल इशारा दिल्यानंतर ओझोनचा थर कमकुवत करणाऱ्या रसायनांचा वापर हळूहळू संपुष्टात आणला गेला.

इक्वेडोरच्या क्विटो येथील एका संमेलनात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार 2030 पर्यत उत्तर ध्रूवावरील ओझोनचा वरच्या बाजूचा थर पूर्णपणे दुरुस्त होणार आहे. अंटार्क्‍टिक ओझोन छिद्र 2060 पर्यंत गायब होणार आहे. तर दक्षिण ध्रूवाच्या दिशेने ही प्रक्रिया काहीशी मंद असली तरीही त्याचा ओझोनचा थर शतकाच्या मध्यापर्यंत पूर्ववत होणार आहे. ही अत्यंत चांगली बातमी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओझोनला धक्का पोहोचणारे घटक वाढले असते तर आम्हाला भयावह प्रभाव दिसून आला असता, जो आम्ही रोखला असल्याचे नासाच्या गोडार्ड अंतराळ केंद्राच्या प्रमुखांनी म्हटले आहे. ओझोनचा थर सूर्याकडून येणारी अतिनील किरणे रोखतो. ही अतिनील किरणे थेट पृथ्वीवर पोहोचली असती, तर त्यांच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्‍यात येऊ शकली असती. त्यामुळे ओझोनच्या थराचे संरक्षण करण्यावर गेल्या काही वर्षांपासून भर दिला जात आहे.

अनेक पर्यावरणवादी स्वयंसेवी संघटनांनी या संदर्भात जनजागृतीच्या मोहिमाही राबवल्या आहेत. ओझोनला अपायकारक ठरणाऱ्या वायूंचे उत्सर्जन रोखणे, वातावरणातील कचऱ्याचे प्रमाण नियंत्रित राखणे, पवनचक्‍क्‍यांचे प्रमाण आवश्‍यक तेथेच राखणे यासारख्या उपाय योजनांवर भर दिला गेला. त्यामुळेच ओझोनचा थर “जैसे थे’ राखण्यात यश येऊ लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)