ओझर येथे मंगलमय वातावरणात द्वारयात्रेस प्रारंभ

ओझर- भाद्रपद चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र ओझर येथे द्वारयात्रेला प्रारंभ झाला असून उंब्रज येथील पहिला द्वार मंगलमय वातावरणात पार पडला. गणेश जयंती उत्सवाला गणपती उंब्रज, धनेगाव, शिरोली खुर्द व ओझर येथील आंबेराई येथील मंदिरामधील देवींना निमंत्रित करण्यासाठी पालखीतून जातात, अशी आख्यायिका आहे. या द्वारयात्रेला शेकडों वर्षांची परंपरा असून द्वारयात्रा मार्गावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी भाविकांना खिचडी, केळी, वेफर्स व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
भाविक श्रींच्या पालखीसोबत अनवाणी चालतात. आज पहिला द्वार उंब्रज येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये लक्ष्मी-नारायणाची पूजा करून पार पडला. उंब्रज ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला. ओझर येथून श्रींच्या पालखीचे टाळ मृदुंगांच्या गजरात व गणरायाच्या नामघोषात येडगाव धरणाच्या जलाशयातून होडीतून उंब्रज येथे आगमण झाले. त्यानंतर गणराय आपल्या बहिणीला निमंत्रित करून आले. येडगाव जलाशयाजवळ ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे व इतर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)