ओझर्डे-वाई रस्त्यावरील विद्युत पोल धोकादायक स्थितीत

भुईंज, दि. 10 (वार्ताहर) – ओझर्डे ते वाई रस्त्याच्या दुतर्फा उभे केलेले लाईटचे पोल खचल्याने मोठ्या प्रमाणात वाकले आहेत. हे आडवे झालेले खांब ढासळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वेळीच हे खांब सरळ करणे गरजेचे आहे. दरम्यान, महावितरणच्या दुर्लक्षामुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
वाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत गेल्या आठ महिन्यांपूर्वी वाई ते ओझर्डे अशा 10 कि. मी. अंतरापर्यंत विज पुरवठा करण्यासाठी नवीन पोल उभे करण्यासाठी मर्जीतल्या ठेकेदाराची निवड करुन त्यास ठेका देण्यात आला होता. पण, त्या नेमलेल्या ठेकेदाराने पोल उभे करण्याचा अनुभव नसल्याने कामगारांमार्फत खड्डे काढुन घाई गडबडीत पोल उभे करून स्वत:च्या कामाचे पैसे काढुन घेतले. वास्तविक पाहता काम सुरु झाल्यावर जबाबदार अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम करणे आवश्‍यक असतानासुध्दा या कामात “सर्व कामकाज ओके’ असल्याचा बोगस अहवाल तयार करण्यात आला आणि त्या अहवालानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसलीही पाहणी न करताच त्या मर्जीतील ठेकेदाराचे लाखो रुपयांचे बिल काढुन देण्यात आले. आठ महिन्यापूर्वी पोल उभे करुन दिल्यानंतर काही दिवसातच त्यावर लाईटच्या तारा ओढण्यात आल्या. पण, लगेच 15 दिवसानंतर झालेल्या पावसामुळे 10 ते 12 पोलची लाईन आडवी झाली होती. त्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वाईच्या कार्यालयाकडे केल्या होत्या. पण अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार असल्याने त्याच्यावर निकृष्ठ कामाचा ठपका ठेवण्याचे धाडस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळी दाखवले नसल्यानेच आज आठ महिन्यातच हे उभे पोल जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत हे पोल अचानकपणे कोसळल्यास वाई वाठार रस्त्यावर आणी शेत शिवारात शॉक बसुन माणस आणी जनावरांचा मृत्यु हा अटळ आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)