ओझर्डे येथील ट्रॉमा सेंटरच्या अनाधिकृत कामाच्या चौकशीसाठी खासदार बारणे आग्रही

पवनानगर – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांची संख्या मोठी आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ प्राथमिक वैद्यकिय सेवा मिळावी म्हणून राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून ट्रॉमा सेंटर बाधण्याचे काम एका खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या काळातील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी संबंधित ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे.

गेले अनेक वर्षे या ट्रॉमा सेंटर बांधण्यास लागले आहे. या ठेकेदाराने ट्रॉमा सेंटरच्या जागेमध्ये अनेक अनाधिकृतपणे हॉटेल, फूडमॉल, शॉपींग सेंटर उभे केले आहेत. या ट्रॉमा सेंटर लगत अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना ने-आण करण्यासाठी हेलिपॅड बांधले असून, हे हेलिपॅड म्हणजे या फूडमॉलची पार्कींगची व्यवस्था झाली आहे.

-Ads-

यासंदर्भात ठेकेदाराने दखल घेण्यात आली नाही. खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि. 3) सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. या ट्रॉमा सेंटरमध्ये झालेल्या अनाधिकृत कामाची चौकशी करून यामध्ये झालेली अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. ट्रॉमा सेंटरच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला असून, ट्रॉमा सेंटरमध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामाची चौकशी करावी व पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातात जखमी झाल्या रुग्णांना ट्रॉमा सेंटरचा लाभ व्हावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)