ओझर्डे ते भुईंज रस्त्याची दूरवस्था

ओझर्डे- ओझर्डे ते भुईंज या तब्बल तीन कि. मी. लांब असलेल्या या रस्त्याची अनेक वर्षांपासून चाळणी झाली आहे. रस्त्यावर फूट ते दिड फुटांचे खड्डे पडल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

ओझर्डे या गावाची लोकसंख्या सात हजाराच्या आसपास आहे. या गावातून पाचवड, सातारा, भुईंजकडे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुर यांना जाण्या येण्यासाठी ओझर्डे ते भुईंज हा रस्ता फारच जवळचा असल्याने त्याचा सर्वजण वापर करत असतात. ओझर्डे -भुईंज या रस्त्याच्या दुतर्फा गावातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्‍टर जमिनी असल्याने ते याच रस्त्यावरुन आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्‍टरमधुन शेती उपयोगी औजारे, खते, बी- बियाने जीव मुठीत धरुन घेवून जात असतात.

-Ads-

अनेक शेतकरी, पादचारी आपली जनावरे शेतात नेत असताना गंभीर अपघात झाले आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासुन वाई पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देवून तो तातडीने दुरुस्त करुन द्यावा अन्यथा, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)