ओझर्डेतील सोनेश्‍वर मंदिरात भाविकांची रिघ

ओझर्डे ः शिवकालिन सोनेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी होते.

निलेश पोतदार
ओझर्डे, दि. 3 – ओझर्डे गावातून वाहत असलेल्या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या सोनेश्‍वर मंदिरात श्रावण महिन्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सोनेश्‍वर मंदिर हे शिवकालीन असून या मंदिराला ऐतिहासिक परंपरा आहे.
श्रावण महिना सुरू झाल्यापासून प्रत्येक सोमवारी वाई तालुक्‍यातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी होत आहे. सोनेश्‍वर मंदिरातही सोमवारी बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तीचा जागर सुरू असतो. कृष्णा नदीच्या काठी सोनेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याकडे भक्तांचा जास्त कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच महादेवाच्या मंदिरालगत असलेल्या ऋषीमुनींची समाधी व महादेवाचे मंदिर या दोन ऐतिहासिक मंदिरामध्ये दर्शनासाठी वाई तालुक्‍यातून भाविक येत आहेत. अशीच परिस्थिती शहरातील तसेच इतर ठिकाणी असलेल्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दिसून येत आहे. ओझर्डेपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर कृष्णा नदीच्या काठी महादेवाचे तीर्थ स्थान निसर्गरम्य वातावरणात असल्याने भाविकांचा याकडे ओढा आहे. मंदिराचे पवित्र वातावरण व ऋषी मुनींची समाधी पाहण्यासाठी पर्यटनाची गर्दी पाहायला मिळत आहे. श्रावण महिन्यात ओझर्डे गावातील ग्रामस्थ पहाटेच्या सुमारास महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. सोनेश्वर मंदिराचे काही दिवसांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले आहे. भाविकांसाठी सोयीसुविधाही उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सोनेश्वर सेवेकरी मंडळाने ग्रंथालयासह अनेक उपक्रम राबवले आहेत. मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाला दर सोमवारी अभिषेक घातला जातो. अभिषेक पार पडल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ही परंपरा गेले पंधरा वर्षे चालू आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी निवासाची सोयदेखील केली गेली आहे.
काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या परिसरात घाणीचे व झाडाजुडपांचे साम्राज्य पसरलेले होते. मंदिराची देखील पडझड झाली होती. या प्राचीन मंदिराची डागजुगी करून हे प्राचीन मंदिर जपणे हे ओझर्डे गावातील ग्रामस्तानी एकत्र येऊन मंदिराच्या परिसरातील व मंदिराच्या सुधारणा केल्या आहेत. तसेच सोनेश्वर सेवेकरी मंडळाने पूर्णपणे मंदिराची जपणूक केली आहे. मंदिरासाठी स्वतंत्र अन्नदान खोलीदेखील तयार केली आहे. विशेष म्हणजे मंदिरात लग्न समारंभासारखे मोठे कार्यक्रमदेखील होत असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)