ओझरला रंगल्या मॅटवरील कुस्त्या

महिलांच्या देखील कुस्त्यांचे आयोजन
ओझर- अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेल्या पाच दिवस सुरु असलेल्या श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता मॅटवरील कुस्त्यांच्या आखाड्याने झाली. यावेळी महिलांच्या देखील कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे, सोलापूर, नगर, मुंबई, सातारा जिल्ह्यांतील नामवंत मल्लांनी या आखाड्यास हजेरी लावली. ओझर आणि परिसरातील शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी, हिवरे बुद्रुक, हिवरे खुर्द, धोलवड आदी पंचक्रोशीतील गावातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आखाड्यात पंच म्हणून किशोर कवडे, कैलास घेगडे, गणेश राऊत, भास्कर कवडे, मंगेश मांडे यांनी काम पहिले. या प्रसंगी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाब पारखे, उपसरपंच प्रदीप चाळक, जिल्हा युवसेनेचे प्रमुख गणेश कवडे, पंचायत समितीचे माजी सदस्य गणपत कवडे आदी मान्यवरांच्या हस्ते मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. या प्रसंगी स्व. अप्पासाहेब जोगळेकर यांच्या स्मरणार्थ जोगळेकर कुटुंबियांकडून विजयी पहिलवानास ढाल व रुपये 1001 रुपये देण्यात आले. शेवटची कुस्ती जुन्नर केशरी आणि आंबेगाव केशरी यांची आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते लावण्यात आली.

आखाड्याचे समालोचन देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, माजी अध्यक्ष नवनाथशास्त्री कवडे, कैलास मांडे यांनी केले. यात्रेउत्सवाचे नियोजन विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामविकास संस्था ओझर यांनी केले. तसेच सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त बबन मांडे, शंकर कवडे, पांडुरंग जगदाळे, देविदास कवडे व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)