“ओएलएक्‍स’ वर खोटी जाहिरात करून फसवणूक करणारा अटकेत

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – फ्लॅट भाड्याने द्यायची असल्याची जाहिरात “ओएलएक्‍स’ वर केली. ती जाहिरात पाहून संपर्क केलेल्या व्यक्तीला फ्लॅट दाखवून डिपॉझितपोटी स्विकारलेले 15 हजार रुपये लांबविल्याप्रकरणी एकास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याला 21 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी आणखी तिघांची सुमारे 60 हजार रुपयांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
अमेय अनिल घोलप (रा. नवी पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. तर अनिल घोलप, अमेय घोलप याच्या आई आणि पत्नीविरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय व्यक्तीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 7 मे रोजी घडली. ओएलएक्‍स या संकेतस्थळावर अमेय घोलप याने भाड्याने फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात दिली होती. फिर्यादी यांना फ्लॅट भाड्याने हवा होता. त्यामुळे ती जाहिरात पाहून फिर्यादी यांनी अमेय याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी अमेय याने त्यांना फ्लॅट दाखविला. त्या फ्लॅटला सात हजार रुपये दरमहा भाडे आणि डिपॉझिट स्वरुपात 15 हजार रुपये द्यावेचे ठरले. फिर्यादींनी फ्लॅट आवडल्याने अमेय याला डिपॉझिटचे 15 हजार रुपये त्वरित दिले. त्यानंतर अमेय याने फिर्यादीला फ्लॅट भाड्याने दिलाच नाही. फिर्यादीकडून घेतलेली रक्कमही परत दिली नाही. फिर्यादी यानी अमेय याच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी अमेय याच्या घरच्यांनी फिर्यादींना धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमेय याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासठी तसेच अन्य तीघांची सुमारे 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत आणि त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याबाबत तपास त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील अऩंत चौधरी यानी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)